ठळक घटना

 

लोकमान्य टिळक – संक्षिप्त जीवनपट

 

१८५६ ते १८७९ बालपण व शिक्षण

१८५६

२३ जुलै रोजी रत्नागिरी शहरात जन्म, पाळण्यातील नाव केशव.

१८६४

उपनयन संस्कार ; अमर कोष ३ कांडे( १६०० श्लोक ) तोंडपाठ. संस्कृत व गणित या विषयांचा अभ्यास व दोन्हीमध्ये उत्तम गती.

१८६६

टिळक कुटुंबाचे पुणे येथे स्थलांतर ; मातोश्री पार्वतीबाई यांचे देहावसान.

१८७१

चिखलगाव येथे सत्यभामा ( पूर्वाश्रमींच्या तापी बाळ ) यांजबरोबर विवाह

१८७२

वडील गंगाधरपंत यांचे निधन. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण. 

१८७६

गणित विषयासह बी.ए. ची परीक्षा प्रथम वर्गात उत्तीर्ण

१८७९

कायद्याची एल. एल. बी. परीक्षा प्रथम वर्गात उत्तीर्ण

१८८० ते १८९०

१८८०

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यासमवेत पुणे येथे ‘न्यू इंग्लिश स्कूल’ ची स्थापना 

संस्कृत व गणित या विषयांचे अध्यापन

१८८१

मराठा (इंग्रजी) व केसरी या साप्ताहिकांच्या प्रकाशनाचा प्रारंभ.

१८८२

आगरकरांसमवेत 'कोल्हापूर' प्रकरणात १०१ दिवसांचा कारावास

१८८४

डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना. एम. ए. ची परीक्षा अनुत्तीर्ण.

१८८५

फर्ग्युसन कॉलेजची स्थापना.

१८८७

रु. ७५००/- कर्जासकट 'केसरी' खरेदी केला.

१८८९

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश

१८९०

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सभासदत्वाचा राजीनामा. संमतीवयाच्या कायद्याविरुध्द चळवळ

१८९१ ते १९०७

१८९१

कायद्याचा वर्ग - उपजीविकेचे साधन

१८९२

पं. रमाबाईंच्या 'शारदासदन' ला विरोध. चहा ग्रामण्य.स्वामी विवेकानंदांची भेट व त्यांचे टिळकांच्या घरी ८ दिवस वास्तव्य.

१८९३

'ओरायन'  ग्रंथ प्रकाशित झाला. हिंदू- मुस्लिम दंगा.

१८९४

सार्वजनिक गणेशोत्सवांचा हिरिरीने पुरस्कार. मुंबई विद्यापीठाचे 'फेलो'. बापट कमीशनवर काम व फळ.

१८९५

शिवाजी उत्सवाचा प्रारंभ. कायदे कौन्सिलचे सदस्यत्व. सार्वजनिक सभेत वर्चस्व

१८९६

रायगडावर पहिला शिवाजी उत्सव. दुष्काळ निवारण्याची चळवळ

१८९७

रँड साहेबाचा खून. सरकारने टिळकांवर पहिला राजद्रोहाचा खटला भरून दोषी ठरविले. (२२ जून ) ; पहिल्या राजसाहेबाच्या खटल्यात १८ महिन्याची सक्त मजुरी ( १४ सप्टेंबर ). प्लेगची साथ.

१८९८

ताईमहाराज प्रकरणात प्रोबेट मिळविले. तुरुंगातून मुक्तता.

१८९९

दक्षिण भारताकडे प्रयाण. विलायतेतील 'ग्लोब' पत्रावर बेअब्रूची फिर्याद. 'ग्लोब' व 'टाईम्स', यांच्याकडून क्षमायाचना. कॉग्रेससाठी लखनौ येथे प्रयाण.

१९००

वेळास येथे 'नाना फडणीस' उत्सवात उपस्थिती.

१९०१

जून पासून ताईमहाराज  प्रकरण पुढे सुरु झाले. कलकत्त्यास स्वामी विवेकानंदांची भेट. 'गीता रहस्य' संबंधी प्रथम जाहीर विचार.

१९०२

ताईमहाराज प्रकरणी टिळकांवरील खटला ऑक्टोबरपासून सुरु झाला.

१९०३

'आर्क्टिक होम इन वेदाज' हे पुस्तक प्रसिद्ध. ज्येष्ठ पुत्र विश्वनाथ यांचा मृत्यू.

१९०४

ताई महाराज फौजदारी खटल्यात निर्दोष मुक्तता

१९०५

राष्ट्रीय कर्तव्याची (स्वदेशी,बहिष्कार,राष्ट्रीय शिक्षण) यांची हिरिरीने तरफदारी. स्वदेशी को-ऑपरेटिव्ह स्टोअर्सची मुंबईत स्थापना. पैसाफंडाचा प्रचार. वंगभंग चळवळ. फाळणी रद्द करविली.

१९०६

रशियन, जर्मन, ऑस्ट्रियन वकिलांशी स्वदेशीनिमित्त भेटी. पंढरपुरास व्याख्याने. कलकत्त्याची कॉंग्रेस. स्वराज्याचा उच्चार व प्रचार. कलकत्त्याचा शिवाजी-उत्सव, जून.

१९०७

सुरतेतील कॉग्रेस सभा व कॉग्रेसमध्ये दुफळी.

१९०८ ते १९१४

१९०८

सरकारविरूध्द दुस-या राजद्रोहाच्या खटल्यात दोषी ठरून ६ वर्षे कारावासाची शिक्षा. मंडाले येथे रवानगी.

१९१०

जर्मन व फ्रेंच या भाषांचा अभ्यास व प्रभुत्व. ०२/११/१९१० रोजी गीता रहस्य लेखनास प्रारंभ

१९११

फेब्रुवारी पर्यंत गीतारहस्य लिहून झाले. या ग्रंथाचे प्रकाशन पुढे १९१४ साली झाले.

१९१२

पत्नी सत्यभामाबाई यांचे निधन.

१९१३

वैदिक क्रोनॉलॉजी (ओरायन नवे रूप) लिखाणास प्रारंभ.

१९१४

कारावासातून सुटका व जून महिन्यात पुणे येथे आगमन. गीता रहस्य ग्रंथाचे प्रकाशन.

१९१५ ते १९२०

१९१६

लखनौ करार - हिंदू-मुस्लिम ऐक्य. होमरूल लीगची स्थापना. षष्ठयद्विपूर्तीचा पुण्यात जंगी कार्यक्रम. जनतेतर्फे रु. १ लक्ष भेट. राजद्रोहाचा तिसरा खटला व निर्दोष मुक्तता. "स्वराज्य" हा माझा जन्मसिद्ध अधिकार आणि ते (स्वराज्य) मी मिळवीनच ह्याचा उच्चार.

१९१७

स्वराज्यावरील व्याख्याने.

१९१८

अकोटला टिळकांना 'नोकरशाही' हा शब्द स्फुरला (१० फेब्रुवारी) मुंबईत अस्पृश्यता निवारण परिषदेत भाषण. कामगार वर्गाची सभा. कोलंबो येथे बुद्ध धर्मावर हिंदीत भाषण. ३० ऑक्टोबरला चिरोल खटल्यासाठी इंग्लंडला पोहोचले.

१९१९

 चिरोल खटल्याचा निकाल टिळकांच्या विरोधात गेला.

१९२०

 मे महिन्याच्या आरंभी सिंहगडावर म. गांधींची भेट. जुलै मध्ये ताई महाराज प्रकरणात कायदेशीर लढाई जिंकली. १ ऑगस्टला पहाटे देहावसान.

 

 

Advertisement

  • even news-new
  • even news-new